माझी पहिली पहिणे सायकल राईड.

शुक्रवारचा दिवस होता . दररोज ट्रेकिंग आणि सायकलिंग मुळे शरीराला आराम नव्हता म्हणून उठायला जरा उशीर झाला, उठलो थोडा फ्रेश झालो आणि जॉगिंग ट्रॅक वर हॉलीबॉल खेळायला गेलो नऊ वााजता घरी आलो. आंघोळ नाश्ता पाणी केला साडेदहा वाजता एक जनरल नॉलेज पुस्तक हातात घेतलं बहुतेक दीड तास पुस्तक वाचलं. पुस्तक वाचता वाचता मला शिवम चा आवाज आला ,मी बाहेर आलो तो म्हटला आपण कोठेतरी सायकलिग ला जाऊ वातावरण खूप भारी झालं आहे . मी त्याला म्हटलं आपण कुठे जायचं तो म्हणे सुले डोंगराच्या मागे दोन छोटे तलाव आहेत तेथे जाऊन बसू . मग आमचा प्लान बनला बॅग आणि पाण्याची बॉटल भरली , सायकल काढली आणि आम्ही दोघे निघालो. आम्ही प्रमोद नगर पर्यत आलो . तेव्हा शिवम म्हटला की आपण पहिणे ला पण जाऊ शकतो, आणि मी आज सकाळीच पहिणे रोड ब्लॉग बघितला , मी त्याला म्हटलं चल फिरव सायकल आज जाऊनच येऊ पहिणे ला . आमच्या दोघांच्याही मोबाईल मध्ये चार्जिंग थोडी कमी होती म्हणून मी त्याला म्हटलं की आपण थोड्यावेळ फोन चार्जिंग करू आणि मग जाऊ, आता पहिने जायचं टाईम तर होणारच , कुठे काही प...