माझी पहिली पहिणे सायकल राईड.

 शुक्रवारचा दिवस होता . दररोज ट्रेकिंग आणि सायकलिंग मुळे शरीराला आराम नव्हता म्हणून उठायला जरा उशीर झाला, उठलो थोडा फ्रेश झालो आणि जॉगिंग ट्रॅक वर हॉलीबॉल खेळायला गेलो नऊ वााजता  घरी आलो. आंघोळ नाश्ता पाणी केला साडेदहा वाजता एक जनरल नॉलेज पुस्तक हातात घेतलं बहुतेक दीड तास पुस्तक वाचलं. पुस्तक वाचता वाचता मला शिवम चा आवाज आला  ,मी बाहेर आलो तो म्हटला आपण  कोठेतरी सायकलिग ला जाऊ वातावरण खूप भारी झालं आहे . मी त्याला म्हटलं आपण कुठे जायचं तो म्हणे सुले डोंगराच्या मागे दोन छोटे तलाव आहेत तेथे जाऊन बसू . मग आमचा प्लान बनला बॅग आणि पाण्याची बॉटल भरली , सायकल काढली आणि आम्ही दोघे निघालो.
    आम्ही प्रमोद नगर पर्यत आलो . तेव्हा शिवम  म्हटला की आपण पहिणे ला पण जाऊ शकतो, आणि मी आज सकाळीच पहिणे रोड ब्लॉग बघितला , मी त्याला म्हटलं चल फिरव  सायकल आज जाऊनच येऊ पहिणे ला . आमच्या दोघांच्याही मोबाईल मध्ये चार्जिंग थोडी कमी होती म्हणून मी त्याला म्हटलं की आपण थोड्यावेळ  फोन चार्जिंग करू आणि मग जाऊ, आता पहिने  जायचं टाईम तर होणारच , कुठे काही प्रॉब्लेम आला तर कोणाला फोन करायला , ,बोलवायला फोन मध्ये चार्जिंग हवी.  घरी आलो रेनकोट ,रुमाल ,पाण्याची बॉटल , सर्व सामान सोबत घेतल पण मला मायकल थोडी भीती वाटत होती खूप दिवसापासून तिला मी रिपेअर केली नव्हती . म्हणून मी आर्य  ला कॉल केला त्याला सायकल मागितली.पण  तो माझ्याच‌ मागे लागला कि  मला पण यायचं .मी त्याला म्हटलं अरे  खूप लांब जायचे आहे.  तू  दमशील , थकशील मि  त्याला  समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकलं नाही, त्याला पण सोबत घेतलं आणि दोन वाजता  निघालो.
     सायकलिंग करत करत आम्ही पिंपळगाव बहुला पर्यंत आला आणि जोरात पाऊस सुरू झाला, आहे पटकन रेनकोट घातला आणि  पुढे निघालो . मधूनच शिवम खूप जोरात पुढे निघुन गेला मी पण थोडा स्पीड वाढवला पण आर्यला  थोडा दम लागला म्हणून  तो थोडा हळू येत होता,   मी अजून थोडा स्पीड आवडला आणि  शिवम पर्यंत पोहोचलो. नाही राव आणि धरणाजवळील फळ वाल्याकडून आम्ही अर्धा डझन केळी घेतली आणि पुढे निघालो. अंजनेरी ला पोहोचलो तेव्हा दोघांला भूक लागली होती म्हणून थांबलो  दोन दोन केळीखाल्ल्या आणि आर्यला  कॉल केला तो म्हटला कि मी येते मागून तुम्ही जा पुढे.,
    आम्ही पुढे निघालो अंजनेरी रस्त्यावर जरा चढ  होता त्यामुळे थोडा दम लागत होता तेव्हाच खूप जोरात पाऊस आणि वारा सुरू झाला, असं वाटत होतं की हा वारा आम्हाला खेचून घेऊन जात  आहे. आम्ही थोडा पुढे आलो तेव्हाआम्हाला एक दोन धबधबे लांबून दिसू लागले,  आणि आता असं वाटु लागलं की कधी आम्ही पाहिणे ला पोहोचतो. पहीणे च्या कॉर्नर ला आम्ही थांबलो दोन-तीन बिस्किट खाण्यासाठी घेतले तोपर्यंत आर्य पण मागून आला होता. तेव्हा पाऊस पण थांबला होता मग आम्ही तिघेही सोबत निघालो. पेगलवाडी गावापर्यंत पोहोचलो आणि परत पाऊस सुरु झाला.
    पहिणे रोडवरील धबधबे पाहून मनाला खूप  भारी  वाटत होते , सायकलिंग करायचा खरा आनंद या रोडवर येत होता. मस्त  गाने गात गात , ओरडत ओरडत आम्ही एका पुलाजवळ पोहोचलो. सायकल सोबत  घेतल्या  थोड्या मध्ये गेलो   पाण्यात सायकली लावल्या .पाणी खूप स्वच्छ होते म्हणून मी थोडा वेळ पाण्यात बसलो तिथे मस्त गाणे आहात ओरढत ओरढत आम्ही मजा करत होतो डोंगरातील धबधबे खूप भारी दिसत होते, एवढे भारी दिसत होते की आम्हाला असं वाटतं की हे ठिकाण स्वर्गापेक्षा ही भारी आहे. आम्ही तिघेही या निसर्गरम्य ठिकाणाचा पूर्णपणे आनंद लूटत होतो . या निसर्गरम्य ठिकाणी आम्ही एवढे रमून गेलो होतो की असं वाटतं की सर्व काहीसोडून द्याव  आणि इथेच राहावे, मग थोडावेळ शांतपणे पाण्यात बसलो आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी करत होतो, तेव्हा मला एक डोंगरांमध्ये रिव्हर्स वॉटरफॉल दिसला ते बघून आमचं मन तृप्त होऊन गेलं. परत जोरजोरात ओरडत डान्स करत आम्ही या ठिकाणाचा आनंद घेत होतो .
     एवढी मजा करून हे आमचं मन भरल नव्हतं पण अंधार व्हायला लागला होता म्हणून आम्ही सर्व आवरलं सहा  वाजता  तिथून निघालो थोडासा पुढे आलो आणि ज्याची भीती होती तेच झालं माझी सायकल पंचर झाली मग आम्ही एका दादाला थांबवले, त्यांनी आम्हाला मदत केली मी गाडीवर उलटा बसलो सायकल घेतली आणि पुढे निघालो. गाडीवरून उलट बसून येथील धब्बे पाहताना असं वाटत होते की इथेच घर घ्यावा आणि इथेच राहावे. त्या दादाने मला हायवेवर आणून सोडलं तेथील एका दुकानात सायकलचा पंचर काढला, पंचर निघेपर्यंत  पावणे सात वाजून गेले होते.
     आम्ही सात वाजता तिथून निघालो घरून आणि कॉलनीतल्या मोठ्या दादांचे कॉल येऊन गेले होते, म्हणून आम्ही तिघेही खूप जोरात सायकल चालवत निघालो, रस्त्यावर उतार होता त्यामुळे सायकल अजून जोरात पळत होती आणि आम्हाला मजाही येत होती , जसा जसा अंधार  वाढू लागला होता तसा तसा येथील परिसर अधिक नयनरम्य वाटत होता .महिरावणी पासून उतार जास्त होता त्यामुळे सायकल चालवायला अजून भारी वाटू लागले ,बरोबर आठ वाजता आम्ही कॉलनीत पोहोचलो  आम्ही जो टाईम ठरला होता त्याच टायमावर आम्ही घरी पोहोचतो त्यामुळे मनात एक सॅटिसफॅक्शन होतं सर्व मुलांना आमच्या पूर्ण प्रवासाबद्दल सांगितलं त्यांना घेऊन न  गेल्याबद्दल त्यांची माफीही मागितली
आणि अशा  पद्धतीने माझी पहिली पहिणे सायकल ट्रीप संपली‌..
 पहिणे बद्दल माहिती - पहिणे महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील त्रंबक तालुक्यातील एक गाव आहे. हे खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र विभागात येथे ,नाशिकच्या पश्चिमेस तीस किलोमीटर अंतरावर पहिने हे गाव वसलेले आहे ,त्रंबक पासून पाच किलोमीटर आणि मुंबईपासून एकशे त्रेचाळीस किलोमीटर वर हे गाव  आहे तुम्ही बाईक, कार ,सायकल ,बस वर येथे येऊ शकता.
  माझे सखा सोबती - शिवम तावरे ,आर्य  पगारे.
                    ( नरसिंह सायकलिस्ट)


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

the fort of maratha warrior -" RAMSHEJ FORT "